माने-देशमुख विद्यालयाच्या ६० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

जानेवारी २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयाने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. विद्यालयाच्या ६० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना दरमहा ५०० प्रमाणे ४ वर्षे शिष्यवृत्ती मिळणार आहे. विद्यालयातील साक्षी काळे हिने शिष्यवृत्ती परीक्षेत १७० गुण मिळवून जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवला आहे तर निशिगंधा पवार हिने द्वितीय व अंकिता जाधव हिने पाचवा क्रमांक पटकविला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्यावतीने  हार्दिक अभिनंदन .!!!

Author