विद्यालयाच्या ४८ विद्यार्थ्यांना एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती प्राप्त

राष्ट्रींय आर्थिक मागास शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) परीक्षेत माने-देशमुख विद्यालयाने नेत्रदीपक यश संपादन केले .

विद्यालयाच्या ४८ विद्यार्थ्यांनी यश मिळवले .यशस्वी विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये प्रमाणे ४ वर्षे शिष्यवृत्ती मिळणार आहे .

विद्यालयातील कु . मुल्ला यासिरा महमदशफी हिने या शिष्यवृत्ती परीक्षेत १६६ गुण मिळवून जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवला आहे .

तर पाटील प्रज्वल प्रितम व ऋषिकेश रामचंद्र जाधव यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत तीसरा क्रमांक मिळवला आहे .

यशस्वी विद्यार्थ्यांना  कोयना शिक्षण संस्था , पाटण व शाळेच्या वतीने गौरवण्यात आले .

Author